सोलापूर – सोलापूर महानगरपालिका आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय शहर क्रीडा स्पर्धामध्ये सम्राट अशोक शिक्षण संकुल संचलित यशोधरा ज्युनिअर कॉलेज व यशोधरा प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी वुशू स्पर्धेत यश संपादन करत पदकांची लयलूट केली.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची कठोर मेहनत व जिद्द असून, किशोर चंदनशिवे यांनी घेतलेला नियमित सराव महत्त्वाचा ठरला. या विद्यार्थ्यांना प्राचार्य सुबोध सुतकर, डॉ. पंकज सुतकर आणि क्रीडाशिक्षक सुधीर वाघ व कविता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रमेश सुतकर आणि सचिव विमल सुतकर यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
पदकविजेते विद्यार्थी:
- सुवर्ण: चंद्रशेखर गणेश नरळे, तिलकरत्न पिरपक्ष खरात, अश्वजित संतोष बनसोडे आणि महिबूब जंगलीसाहेब शेख.
- रौप्य: रेहान इरकल, सुरजसिंग गहेरवार, कृष्णा गायकवाड आणि जयशंकर लोखंडे.
- कांस्य: तेजस जाधव, सुरज बनसोडे, इरफान शेख आणि अरबाज शेख.
—————–























