सांगोला – सांगोला महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ताहमी कक्ष व भूगोल विभागाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ओझोन दिवसानिमित्त ओझोन थराचे संरक्षण, पर्यावरणीय शाश्वतता आणि हवामान बदल या विषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोलाचे प्रा.डॉ.बी.डी.पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्र.प्राचार्य डॉ.सुरेश भोसले उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ओझोन दिन विषयी पोस्टर प्रेझेंटेशन तसेच भूगोल विभागाच्या भित्तिपत्रक कॉसमॉसचे उद्घाटन करण्यात आले. मनोगतात प्रा.डॉ.बी.डी.पाटील यांनी ओझोन थराचे पर्यावरणातील महत्त्व स्पष्ट केले. डॉ.सुरेश भोसले यांनी विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख प्रा.संतोष कांबळे, प्रमुख वक्ते परिचय डॉ.अमोल पवार, सूत्रसंचालन डॉ.विकास उबाळे, आभार प्रदर्शन प्रा.शंकर पाटील व यशस्वी करण्यासाठी प्रा.तेजश्री मिसाळ, भूगोल विभाग व अंतर्गत गुणवत्ताहमी कक्षाच्या वतीने परिश्रम घेण्यात आले.