सांगोला – कटफळ (ता.सांगोला) येथील श्री.अष्टविनायक गणेश मंडळ, सांगली येथील सुदर्शन नेत्र रुग्णालय व पंढरपूर येथील ठवरे क्लिनिक यांच्यावतीने कटफळ येथे डोळे, हृदयरोग, मधुमेह तपासणी आणि उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन गजानन मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ.सौरभ ठवरे, डॉ.सुरेश वाघ यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने केवळ धार्मिक कार्यक्रम न ठेवता ग्रामीण भागात असा सामाजिक व आरोग्याभिमुख उपक्रम राबवल्याबद्दल ग्रामस्थांनी श्री अष्टविनायक गणेश मंडळाच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.
Post Views: 11