अकलूज येथे किसनराव नारायण नरुळे यांच्या घरी पूर्वपार चालत आलेले महालक्ष्मीचे मुखवटे आहेत .नरूळे यांच्या पाचव्या पिढीकडून तितक्याच भक्तीभावाने व श्रद्धेने गौरीचे पूजन केले जात आहे यावर्षी या कुटुंबाने बसवेश्वर चौक येथे नियोजित असणारे महात्मा बसवेश्वर स्मारकाचा आकर्षक देखावा सौ.स्नेहल नरुळे,सौ. स्वाती नरुळे व सौ.तेजश्री नरुळे यांच्या संकल्पनेतून साकार केला आहे.ही सजावट पहाण्यासाठी महिलांनी गर्दी केली आहे.या देखाव्याचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे व त्यानिमित्ताने महात्मा बसवेश्वर स्मारकाची उत्सुकता वाढली आहे.
Post Views: 15