सोलापूर : सिटी हॉस्पिटल येथे बुधवारी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत मोफत सांधेरोपण व अस्थिरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात रोबोटिक सांधेरोपण व क्रीडा शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध पाटील रुग्णांची मोफत तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन करणार आहेत.
डॉ. पाटील हे अस्थिरोग व सांधेरोपण क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. तसेच इंग्लंड येथे त्यांनी रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रियेचे विशेष प्रशिक्षण घेतले आहे. अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अचूक सांधेरोपण शस्त्रक्रियेसाठी त्यांचा विशेष अनुभव आहे.
शिबिरात गुडघा, कंबर व खांद्याच्या सांधेदुखीने त्रस्त रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. विशेषतः गुडघ्याचा संधिवात, कंबरेच्या सांध्याचा संधिवात आणि खांद्याच्या सांध्याच्या समस्यांबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रियेची आवश्यकता, पद्धत आणि त्याबाबतची माहितीही रुग्णांना देण्यात येणार आहे.खेळाडूंना होणाऱ्या स्नायू व सांध्यांच्या दुखापतींबाबतही शिबिरात विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे. नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शिबिरात वेळेचे नियोजन व रुग्णांची सुलभता लक्षात घेऊन पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी ९८२२५०३२९९ या क्रमांकांवर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
—-
Post Views: 38