पंढरपूर – येथील श्री गणेश सेवा गणेशोत्सव मंडळ पश्चिम द्वार पंढरपूर यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त रविवारी (दि.२०) पंढरपूर कॉरिडोर का नको या विषयावर प्रश्नोत्तरी परिसंवादाचे आयोजन केले होते. संभाव्य बाधित मंडळींकडून या परिसंवादाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
या प्रश्नोत्तरी परिसंवादा मध्ये बचाव समितीच्या वतीने नागरिकांना कॉरिडॉर विरोधाची पार्श्वभूमी समजावून घेण्यासाठी विरोध कशासाठी यावर प्रश्न विचारण्यासाठी संधी दिलेली होती त्याप्रमाणे अनेक नागरिकांनी भर कार्यक्रमात प्रश्न विचारले व त्यांना सन्माननीय वाक्यांनी योग्य उत्तरे देऊन त्यांचे समाधान करण्यात आले. कॉरिडॉर मध्ये भाविकांचे हित काहीही नाही. एकदोन मंत्र्यांच्या अट्टहासा पोटी हा कार्डर चालला आहे कॉरिडोर मध्ये घेतलेले अनेक प्रकल्प हे मंदिरापासून थोड्या लांबच्या ठिकाणी घेणे हेच जास्त संयुक्तिक ठरणार आहे. त्यामुळे असे प्रकल्प देवळाजवळ घेऊन गर्दीचे केंद्रीकरण होणार आहे व ते धोकादायक ठरणार आहे म्हणून कॉरिडॉरला नागरिकांचा पूर्ण विरोध आहे परंतु शासनातील एक दोन मंत्री यांचाच फक्त अट्टाहास आहे.
पंढरपुरातील सर्वात प्राचीन मंदिर असणारे श्री मल्लिकार्जुन मंदिर पाडण्याचा घाट घातला आहे. याशिवाय ही आणखी काही मठ मंदिरांचे उध्वस्तिकरण होणार आहे. बादले पाटील यांनी अनेक पर्यायी उपाय योजना सुचविल्या आहेत परंतु शासन त्याकडे मुद्दामहून दुर्लक्ष करत आहे. उच्च न्यायालय विधींज्ञ ज्ञानेश्वरी उत्पात यांनी कायदेशीर तरतुदी सांगितल्या. जेष्ठ पत्रकार अतुल बहिरट यांनीही या प्रकल्पातील त्रुटी दाखवून दिल्या. कोळी समाजाचे युवक नेते सुनील अधटराव यांनी मल्लिकार्जुन मंदिर बचावासाठी उद्यापासून आमरण उपोषणाला बसत असल्याचे सांगितले. तर युवा नेते गणेश अंकुशराव यांनी चंद्रभागेच्या वाळवंटात होणाऱ्या वारकऱ्यांच्या हालापेष्टांची माहिती दिली.
पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीचे अध्यक्ष अभयसिंह इचगावकर यांनी कॉरिडॉर प्रकल्पातील प्रत्येक प्रकल्पांची व्यर्थता दाखवली व आता आहे त्या ठिकाणी सर्व गोष्टी कशा राबवल्या जातील हे दाखवून दिले. गेले पन्नास वर्षे गणेश सेवा मित्र मंडळ गणेशोत्सवात व एरवी ही देव, देश आणि धर्मासाठी क्रांतिकारी कार्य करीत असते याबाबत धन्यवाद दिले. मंडळाचे प्रमुख बालाजी महाजन बडवे, गणेश बेणारे, गवळी परिवार आदी मान्यवरांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
——————
चौकट : ( यांनी घेतला सहभाग )
पंढरपूर कॉरिडोर का नको या विषयावर प्रश्नोत्तरी परिसंवादा मध्ये पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीचे अध्यक्ष अभयसिंह इचगावकर, पत्रकार अतुल बहिरट, व्यासंगी व विद्वान लेखक राधेश बादलेपाटील, लढाऊ युवा नेते गणेश अंकुशराव, सुनील अधटराव, अधिवक्ता ज्ञानेश्वरी उत्पात, गणेश लंके, व्यंकटेश गलगलकर, आदी मान्यवरांनी प्रबोधन केले.
——————-
चौकट : ( पुढच्या वर्षी बाप्पा याच घरात येतील )
गतवर्षी याच मंडळापुढे कॉरिडोर हटावच्या मागणीसाठी गणेश याग झाला होता. गणपतीने आपल्याला आत्तापर्यंत साथ दिलेली आहे आणि याही पुढे साथ देणार आहे. गतवर्षीची घोषणा होती, “गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी याच घरी या” ती सार्थ झालेले असून यावर्षी व पुढील वर्षीही देखील गणपती बाप्पा याच घरात येतील असा आशावाद व्यक्त केला.
Post Views: 15