साखर पेठ येथील बाहुसार शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हिंगुलांबिका प्राथमिक शाळेत गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. श्री गणेश प्रतिष्ठापनेपासून दररोज शाळेत वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. हस्ताक्षर स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा इ. स्पर्धा घेण्यात आल्या. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, झाशीची राणी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, जवाहरलाल नेहरू, सावित्रीबाई फुले, शंकर, पार्वती, श्रीकृष्ण, विठ्ठल-रुक्मिणी, श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान, परी, भाजीवाली, हमाल इ. वैविध्यपूर्ण वेशभूषांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. या विविध स्पर्धामध्ये जवळपास ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या स्पर्धेत सहभागी होऊन बक्षीस मिळविले. गणेशोत्सव काळात विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह व आनंद दिसून येत होता.सर्व स्पर्धकांचे बाहुसार शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री बापू ढगे व सचिव श्री विजय पुकाळे यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
Post Views: 11