धाराशिव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कळंब तालुक्यातील मलकापूर येथे दुष्काळसदृश परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतशिवारात जाऊन परिस्थितीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच दुष्काळामुळे झालेल्या पीक नुकसानीची माहिती शेतकऱ्यांकडून जाणून घेतली.
यावेळी शेतकऱ्यांनी दुष्काळामुळे निर्माण झालेल्या अडचणी, पिकांचे नुकसान तसेच शेतीसमोरील विविध प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत परिस्थितीची माहिती घेतली.
या पाहणी दौऱ्यात मंत्री प्रताप सरनाईक, खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष शेतशिवारात जाऊन पाहणी केल्याने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले गेले आहे.