पिलीव – महुद येथील बॅक ऑफ इंडियाच्या शाखेच्या वतीने ग्राहक व ग्रामस्थांना ऑनलाईन फसवणूक व बँकांच्या विविध योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. डिजीटल व सायबर फसवणुक याबाबत तसेच हॅकींग, फिशिंग, ङिजीटल अरेस्ट, ओटीपी फसवणूक, याबाबत अतिशय सावध राहणे आवश्यक आहे. बँकेच्या संबंधित ओटीपी, पिन, पासवर्ड, अथवा इतर कोणतीही बँकेच्या संबंधित गोपनीय माहीती कोणालाही देऊ नये. बॅक ऑफ इंडियामध्ये प्रधानमंञी सुरक्षा विमा योजना, प्रधानमंञी जिवन ज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना यासह विविध योजनांची सविस्तर माहीती यावेळी देण्यात आली. बॅक ऑफ इंडियाचयावतीने मुदत ठेव, आवर्ती ठेव, आरोग्य विमा, मॅचयुल फंड विविध उत्पादने तयांचे फायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. बँकेमार्फत किसान क्रेडिट कार्ड, किमान वाहन कर्ज, पशुपालन कर्ज, कृषी मुदत कर्ज, कृषी संलग्न व्यवसायासंबंधी सुविधांची सविस्तर माहीती यावेळी देण्यात आली.यावेळी सायबर सुरक्षितता, सुरक्षित डिजीटल बॅकींग, आर्थिक साक्षरता, शासकीय योजना, बॅकींग सुविधा, कृषी वित्त पुरवठा, भ्रष्टाचाराविरोधातील सतर्कता याबाबत उपस्थित ग्रामस्थ व ग्राहकांना यावेळी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.यावेळेस. यावेळी बँकेच्या मार्केटींग अधिकाऱ्यांना सतर्कता, प्रामाणीकपणा, पारदर्शकता, आणी भ्रष्टाचार प्रतिबंध यांविषयी ग्राहक व ग्रामस्थांना सविस्तर मार्गदर्शन केले. या मार्गदर्शन कार्यक्रमास महुद व आसपासच्या परिसरातील ग्रामस्थ व ग्राहक मोठ्या संखयेने उपस्थित होते.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...





















