दिनांक 21 09 2026 रोजी झालेल्या जिल्हा क्रीडा संकुल ,कुमठा नाका या ठिकाणी रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये स्वामी विवेकानंद पोलीस पब्लिक स्कूलचे मुली सहभागी झाल्या होत्या. त्या स्पर्धेमध्ये आरोही गाडे तृतीय क्रमांक व अक्षता बागलकर चौथा क्रमांक आलेला असून आरोही गाडे या विद्यार्थिनीची विभागाला निवड झाली आहे.
त्यांच्या या यशाबद्दल शाळेचे कमिटी अध्यक्ष मा. पोलीस आयुक्त एम. राजकुमार , मा. पोलीस उपायुक्त वृष्टी जैन , मा. सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्र माळाळे , मा. पोलीस निरीक्षक वैष्णवी पाटील , आय.एम.एस. ग्रुप ऑफ स्कूलचे सचिव मा. श्री. अमोल जोशी , श्री साई महिला प्रतिष्ठानच्या सचिवा मा. सौ. सायली जोशी , शाळा समन्वयक मा. सौ. ममता बसवंती व मुख्याध्यापिका स्वाती कारंडे यांनी अभिनंदन केले. या विद्यार्थ्याना क्रीडा शिक्षक प्रमोद म्हेत्रे यांचे मार्गदर्शन लाभले.
—–
Post Views: 26