सोलापूर – तालुकास्तरीय १४ वर्षांखालील तायक्वांदो स्पर्धेत एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूलचा इयत्ता सहावीतील विद्यार्थी सूर्यतेज रामचंद्र पाटील याने उल्लेखनीय कामगिरी करत जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.
सूर्यतेजने स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत आपल्या कौशल्याची छाप पाडली. त्याच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सूर्यतेजला शाळेचे क्रीडा शिक्षक अजय पारिक व ऋतू भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या यशाबद्दल शाळेच्या प्राचार्या रुपाली हजारे यांनी अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
—–
Post Views: 14