Thursday, September 24, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पुढच्या वर्षी लवकर या..च्या जयघोषात साताऱ्यात विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ

तरुण भारतbyतरुण भारत
September 24, 2026
in west maharashtra
0
पुढच्या वर्षी लवकर या..च्या जयघोषात साताऱ्यात विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सातारा – सालाबाद प्रमाणे अनंत चतुर्दशीच्या अगोदर एकच दिवस सातारा शहरातील अनेक मान्यवर मंडळांनी वाहतुकीला अडथळा नको तसेच अनंत चतुर्दशी दिवशी होणारी रस्त्यातील गर्दी कमी करण्यासाठी आपल्या मंडळाच्या गणेश मूर्तीला सायंकाळीच विसर्जन मिरवणूक काढून निरोप दिला.
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.. जयघोषात या मिरवणुकीला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. सातारचे माजी नगराध्यक्ष अच्युत गोडबोले तसेच ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत कात्रे व मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे व मान्यवरांच्या शुभहस्ते शंकर पार्वती गणेशाची आरती करून या मिरवणुकीला प्रारंभ झाला .
सातारा शहरातील मानाचे शेटे चौकातील प्रकाश मंडळ यांच्या शंकर-पार्वती गणेशाची मिरवणूक निघाली. यावर्षी प्रकाश मंडळाने साकारलेल्या भव्य देखाव्यातील भव्य प्रतिमा ट्रॅक्टर वर सजवण्यात आली होती त्यापुढे ही पर्यावरण पूरक शंकर-पार्वती गणेशाची मूर्ती फुलांच्या सजावटीत ठेवण्यात आली होती. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन केल्यावर पुष्पवृष्टी करत शंखनाद करत महिलांनी ..गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या..चा जयजयकार केला.पुणे येथील राजकमल ब्रास बँड पथक तसेच रंगावली रांगोळी कलाकारांनी चौकाचौकात काढलेल्या रांगोळ्या विशेष लक्षवेधक ठरक होत्या.
बेलकर्स ग्रुपच्या निनाई देवी ढोल पथकाच्या युवा कलाकारांमध्ये विशेष करून नाकात नथी घालून ढोल वादन करणाऱ्या युवती या मिरवणुकीत विशेष लक्षवेधक ठरत होत्या. त्यानंतर शहरातील मंडईचा राजा मंडळाची निघालेली मिरवणूक ही भव्य दिव्य अशी होती. ढोल व ताशा पथकाच्या कलाकारांनी केलेले ढोल व ताशांचे वादन सर्वसाधारण चे लक्ष वेधून घेणारे होते, गुरुवार पेठ येथील सिद्धिविनायक गणेश मंडळाने आपल्या विसर्जन मिरवणुकीत केलेली फुलांची आरास विशेष लक्षवेधक अशी होती भगवान विष्णूच्या हातातील शंख,चक्र यांचे दर्शन या फुलांच्या सजावटीतून कलाकारांनी रेखाटले होते या पार्श्वभूमीवर सिद्धिविनायक गणेशाची मूर्ती मिरवणुकीमध्ये प्रतिष्ठापित करण्यात आली होती. माची पेठेतील बाल स्फूर्ती मंडळ, यादोगोपाळ पेठेतील अजिंक्यतारा गणेश मंडळ, केसरकर पेठेतील मयूर सोशल क्लब, क्रांती मंडळ, करंज्याचा रजा पोवई नाका परिसरातील लोणार गल्लीतील श्री गणेशोत्सव मंडळ मल्हार पेठेतील गोल्डन मंडळ प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी बसवलेल्या गणेशाची मिरवणूक निघाली. त्याचप्रमाणे सातारा जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या बाल हनुमान गणेश मंडळाची मिरवणूकही पोलिसांनी साध्या वेशात अगदी धोतर, शर्ट, डोक्यावर टोपी घालून मोरयाच्या जयघोषात काढली.
सातारा शहरातील विसर्जन मिरवणुकी निमित्त अनेक मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले असून या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे सातारा जिल्हा पोलीस दलाचे मुख्य जिल्हा पोलीस प्रमुख व मान्यवर पदाधिकारी या मिरवणुकीच्यासाठी विशेष परिश्रम घेत असून ठीक ठिकाणी सी.सी .कॅमेरे पोलिसांचे गस्त पथक ,होमगार्ड आदी विशेष परिश्रम घेत आहेत .अनंत चतुर्दशी दिवशी सकाळी मानाचा सम्राट महागणपती पंचमुखी मंडळ तसेच मोती चौकातील प्रतापसिंह गणेश मंडळाची मिरवणूक सुरू होईल.
अनंत चतुर्दशीला सायंकाळी पाच वाजता राजवाडा येथून सातारा नगरपालिकेच्या मध्यवर्ती गणेश मंडळाच्या मूर्तीचे आरती व पूजन होऊन मुख्य मिरवणुकीला सुरुवात होईल .यानिमित्त विविध ठिकाणी विसर्जन हौद तसेच विसर्जन तळी उभारण्यात आली असून राधिका परिसरातील मुख्य विसर्जन तयार मोठी महाकाय क्रेन मोठे गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी तैनात करण्यात आली आहे .विशेष विद्युत रोषणाईचा झोतामध्ये दिवस-रात्र हे विसर्जन तसेच त्यासाठी खास म व्यवस्थाही करण्यात आली आहे पालिकेच्या वतीने मूर्तींचे विसर्जनासाठी विशेष कर्मचारी पथक तैनात करण्यात आले आहे.
सातारचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले तसेच ना.श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे वतीने ही कन्याशाळा येथे या विसर्जन मिरवणुकीमध्ये विशेष स्वागत कक्ष उभारण्यात आले असून विविध मंडळांच्या मान्यवरांचे यावेळी या विसर्जन मिरवणूक सोहळ्यात स्वागत करण्यात येणार आहे .
पोलिसांनी डीजे तसेच लेझर लाईट ला बंदी घातली असून रात्री बारापर्यंत मिरवणुकांना वाद्य वाजवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
अनंत चतुर्दशीच्या आल्या दिवशी मुख्य विसर्जन तळ्यात सातारा येथे53 गणेश मंडळांच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले तर संपूर्ण जिल्ह्यात751 सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्तींना निरोप देण्यात आला .अनंत चतुर्दशी दिवशी जिल्ह्यातील 3342 सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तीचे व सुमारे एक लाख पाच हजारहून अधिक घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे.
=====================================================
फोटो ओळी … 1..सातारा शहरातील प्रकाश मंडळ शेटे चौक यांची शंकर पार्वती गणेशाची निघालेली भव्य मिरवणूक.
शंकर पार्वती गणेशाची आरती करून या मिरवणुकीला प्रारंभ झाला . 2..शेटे चौकातील प्रकाश मंडळाच्या मिरवणुकीमध्ये निनाई देवी ढोल व ताशा पथकाच्या वादनाने सातारकरांना मंत्रमुग्ध केले .3..4..राजकमल पुणे ब्रास बँड चे पथक आणि पुणे येथील रंगावली संस्थेचे कलाकार महारांगोळ्या रेखाटताना .5.. मोती चौकात विविध रंगातील भव्य महा रांगोळी रेखाटून कलाकारांनी अभिवादन केले तो क्षण.6.. क्रांती गणेश मंडळांनी काढलेली गणेशाची बँड चा निनादातील भव्य मिरवणूक सर्व फोटो …अतुल देशपांडे, सातारा.
Post Views: 13
Previous Post

उद्योग बँक माजी सेवक सांस्कृतिक मंडळ , रोटरी क्लब ऑफ सोलापूर एमआयडीसी बौद्धिक व्याख्यानमाला 

Next Post

एस.पी.एम. इंग्लिश स्कूलचा असित कांबळे शहरस्तरीय स्केटिंग स्पर्धेत प्रथम

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
एस.पी.एम. इंग्लिश स्कूलचा असित कांबळे शहरस्तरीय स्केटिंग स्पर्धेत प्रथम

एस.पी.एम. इंग्लिश स्कूलचा असित कांबळे शहरस्तरीय स्केटिंग स्पर्धेत प्रथम

ताज्या बातम्या

देवगांवमध्ये एकास मारहाण; तिघांविरोधात तालुका पोलिसांत गुन्हा

September 24, 2026
बार्शीत गणेशमूर्ती प्रशासन सज्ज,  विसर्जनासाठी गणेश मूर्तीचे दोन तलावात होणार विसर्जन

बार्शीत गणेशमूर्ती प्रशासन सज्ज,  विसर्जनासाठी गणेश मूर्तीचे दोन तलावात होणार विसर्जन

September 24, 2026
महावितरणच्या लेखी आश्वासनानंतर युवा महासंघाचे आंदोलन स्थगित

महावितरणच्या लेखी आश्वासनानंतर युवा महासंघाचे आंदोलन स्थगित

September 24, 2026
लायन्स क्लब बार्शी राॅयलच्यावतीने दंत तपासणी व फळे-नॅपकिन वाटप

लायन्स क्लब बार्शी राॅयलच्यावतीने दंत तपासणी व फळे-नॅपकिन वाटप

September 24, 2026
कुमठ्यात रविवारी जलयात्रा महोत्सवाच्या आयोजन

कुमठ्यात रविवारी जलयात्रा महोत्सवाच्या आयोजन

September 24, 2026
मनोहर सपाटे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर

मनोहर सपाटे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर

September 24, 2026
मुंबई, पुणे, रायगडच्या संघांना मागे टाकत धाराशिवचा संघ उपविजेता

मुंबई, पुणे, रायगडच्या संघांना मागे टाकत धाराशिवचा संघ उपविजेता

September 24, 2026
सांगोला महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धा उत्साहात

सांगोला महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धा उत्साहात

September 24, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1253509

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!