पंढरपूर : कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर येथे आज आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत एम आय टी ज्युनिअर कॉलेज वाखरीच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
१९ वर्षे वयोगटातील १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत तन्मय होले (इयत्ता १२ वी कॉमर्स) याने प्रथम क्रमांक मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली. तसेच विराज खरसडे (इयत्ता ११ वी सायन्स) याने १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवत यश संपादन केले.
याचबरोबर १९ वर्षे वयोगटातील रिले स्पर्धेत तन्मय होले (१२ वी कॉमर्स), विराज खरसडे (११ वी सायन्स), राजवीर खेडकर (११ वी सायन्स), राजवीर बोरसुरे (११ वी सायन्स) आणि कार्तिक ठाकरे (११ वी सायन्स) यांच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षकवृंद व क्रीडा विभागाच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले असून, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या तन्मय होले याला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
Post Views: 6