पंढरपूर – “घराची भरभराट आणि प्रगती साधायची असेल, तर घरातील महिला सक्षम असणे अत्यंत आवश्यक आहे. महिला सक्षम असेल तर कुटुंबाची प्रगतीही लवकर होते,” असे प्रतिपादन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी केले.
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील यशश्री क्लासेस येथे एलआयसी, प्रिती ऑनलाईन शॉप व तेज न्यूज यांच्या वतीने आयोजित गौरी गणपती सजावट स्पर्धा २०२६ च्या बक्षीस वितरण समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी महसूल सहाय्यक अधिकारी राहुल सावंत, एलआयसीचे विकास अधिकारी बी. एस. चौगुले, सरपंच रणजित जाधव, सेवानिवृत्त तलाठी धोंडीराम शिंदे, सेवानिवृत्त अधिकारी बाळासाहेब कापसे, ज्येष्ठ पत्रकार आनंद देशपांडे, यशश्री क्लासेसचे संचालक प्रवीण लिंगडे, पांडुरंग नागरी पतसंस्था सचिव नूतन चौगुले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. मिना माणिक कोले यांनी प्रथम क्रमांक पटकावत १,००० रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र मिळविले. पूनम सुनील माने यांना द्वितीय ७०० रुपये, तर जान्हवी घनश्याम कवडे यांना तृतीय ५०० रुपये व प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच उमा राजेंद्र शिंदे, संध्या संभाजी लोखंडे आणि किरण जयवंत भोसले, सोनाली विशाल माळी यांच्यासह सहभागी १५ स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राची माळवदे यांनी केले. सूत्रसंचालन ओंकार माळवदे यांनी केले, तर आभार प्रशांत माळवदे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सविता कापसे, अनुजा देशपांडे, कोमल शिंदे, वर्षा गांधी, अथर्व चौगुले,अमृता चौगुले यांच्यासह सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 5