सोलापूर – स्व नजीर मुन्शी स्थापित नूर सोशल वेल्फेयर ट्रस्ट तर्फे उमर खलीफ सभागृहात सामाजिक कार्यकर्ते नासीर खलीफा यांच्या अध्यक्षते खाली व ज्येष्ठ साहित्यिक तथा नजीर मुंशी तौसिफी कमेटीचे अध्यक्ष अय्यूब अहमद नल्लामंदू ,अल्पसंख्याक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ हजरत शेख , सचिव उम्मीद सय्यद ,यांच्या प्रमुख उपस्थित अकरा गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी ९ .५ लाखाची शिष्यवृतीचे धनादेश वाटप करण्यात आले . नूर ट्रस्टचे नूतन अध्यक्ष नूर नज़ीर मुन्शी यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले तर सचिव महेमूद नवाज जहागीरदार यांनी प्रास्ताविकेत नूतन कार्यकारी मंडळाची ओळख व ट्रस्टची व शिशुवृतीची सविस्तर माहिती दिली . रफीक खान , डॉ जैनोद्दीन पटेल यांनी प्रमुख पाहुण्यांचे बुके देऊन स्वागत केले .यावेळी डॉ. साजीद हुंडेकर यांनी उच्च शिक्षणा साठी मिळणारे इतर विविध शिष्यवृतीची तांत्रिक माहिती दिली . त्यानंतर . प्रमुख पाहुणे अय्यूब अहमद , नसीर खलीफा , शफी कैप्टन यांनी विद्यार्थांचे मार्गदर्शन करत पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या .
यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ म शफी चोबदार , खजीनदार बिलाल मुगद , सदस्य , रफीक खान , डॉ . जे एन पटेलं , मुनाफ शेख व इक्बाल बागबान , इम्राम जमादार केंद्र प्रमुख सुहेल नाईक , अख्तर शेख , खलील बानकारी
उपस्थित होते
सुत्र संचलन महेमूद नवाज यांनी केले तर आभार डॉ पटेल यांनी मानले .
Post Views: 8