करकंब – करकंब ता.पंढरपूर येथील श्री.चौंडेश्वरी मातेच्या मंदिरात समस्त कोष्टी समाजाच्या वतीने प्रत्येक पौर्णिमेला समस्त कोष्टी समाज बांधव,भगिनींच्यावतीने महाआरतीचेआयोजन करण्यात येते.यास समस्त कोष्टी समाज बांधव,भगिनींचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.त्या अनुषंगाने लता नारायण वासुदेव वास्ते,किर्ती धोंडीराम केरबा भाजीभाकरे,गौरी ओंकार प्रवीण दुधाणे,रेवती मयुरेश संजीवकुमार म्हेत्रे,वैशाली शिवाजी दिलीप टकले या उभयतांच्या शुभहस्ते आई चौंडेश्वरी मातेची पूजा व महाआरती करण्यात आली.यावेळी श्री.चौंडेश्वरी मातेचा जप करण्यात आला.समाज बांधव सिद्धेश्वर भाजीभाकरे यांनी कोणतेही यश यश प्राप्त करावयाचे झाल्यास जिद्द,चिकाटी,मेहनत,ध्यास तसेच आई,वडिलांचे खंबीर पाठबळ परमेश्वराचा आशिर्वाद असेल तर यश निश्चितच मिळते.ते यश मला पहिल्याच प्रयत्नात मिळाले असून आपणा सर्वांचे आशीर्वाद सदैव पाठीशी असुद्यात असे मनोगत व्यक्त केले.महाआरतीनंतर मिष्ठान्न महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.अन्नदाते ट्रस्टी नारायण वासुदेव वास्ते यांचा दिलीप टकले यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.आरती व कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.चौडेंश्वरी मातेचे सेवेकरी ज्ञानेश्वर दुधाणे यांनी केले. महाआरती यशस्वी होण्यासाठी ज्ञानेश्वर दुधाणे,चंद्रकांत रसाळ, प्रभाकर रसाळ,जयंत टकले,गणेश दुधाणे,राजेंद्र करपे,बाळासाहेब वास्ते,माऊली मुखरे,संदेश टकले, गणेश वास्ते,खंडू नडे,अक्षय नडे, अभिजित टेके,हरिश्चंद्र वास्ते, संजय बुगड,अनिल वास्ते, अभिजित वास्ते,प्रफुल्ल शिलवंत, प्रशांत वास्ते,सोमनाथ नरखेडकर,प्रशांत वास्ते,शंकर लाटणे,शेखर सांगोलकर,कैवल्य दुधाणे,सोमनाथ नरखेडकर,आदींनी सुंदर नियोजन केले.
चौकट.
करकंब कोष्टी समाजातील सिद्धेश्वर धोंडीराम भाजीभाकरे या युवकाची चिपळूण येथील वैद्यकीय महाविद्यालयात एम.बी.बी.एस या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाल्याबद्दल समस्त कोष्टी समाज बांधव,भगिनींच्या वत्तीने त्याचा सत्कार करून पुढील शैक्षणिक जीवनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
Post Views: 7