पंढरपूर – अंगारकी चतुर्थीनिमित्त निमित्त श्री शक्षेत्र पखालपूर येथील गणपतीच्या दर्शनासाठी बस सोडण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास व पंढरपूर आगार प्रमुख योगेश लिंगायत यांनी दिली.
श्री क्षेत्र पखालपूर येथे प्राचीन,जागृत असे गणपतीचे मंदिर आहे. नवसाला पावणारा गणपती अशी भाविकांची श्रद्धा आहे.त्याठिकाणी प्रत्येक महिन्यात चतुर्थी दिवशी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. या महिन्यात दि.२९ सप्टेंबर २०२६ रोजी मंगळवारी चतुर्थी आल्याने “अंगारकी योग” आलेला आहे. त्यामुळे भाविकांची मोठी गर्दी होणार हे लक्षात घेऊन सकाळी सात पासून रात्रीपर्यंत श्रीक्षेत्र पखालपूर येथे जाण्या-येण्यासाठी जुन्या बस स्थानकापासून बससेवा सुरू करण्यात येत आहे तरी जाण्या-येण्यासाठी जेष्ठ नागरिक,महिला प्रवाशी भाविकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन स्थानक प्रमुख पंकज तोंडे, बाळासाहेब वाघमारे, नवनाथ दळवे, वाहतुक नियंत्रक अप्पा अष्टेकर आदींसह ग्राहक पंचायतीचे प्रांत पदाधिकारी आणि सदस्यांनी केले आहे.
Post Views: 6