बार्शी – खरीप हंगाम 2026 मध्ये पावसाचा खंड व अपुरा पाऊस यामुळे झालेल्या पीक नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मौजे कव्हे व बळेवाडी येथे महसूल व कृषी विभागाच्यावतीने संयुक्त पंचनामा व पीक पाहणी करण्यात आली.
यावेळी बार्शीचे तहसीलदार एफ. आर. शेख, तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतांमध्ये जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. ग्राम महसूल अधिकारी सुतार, सहायक कृषी अधिकारी पोळ, पीक पाहणी सहायक झळके तसेच माजी सैनिक भगवान पोकळे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. पावसाअभावी खरीप पिकांवर झालेला परिणाम, पिकांची सद्यस्थिती व नुकसानीचे स्वरुप याची पाहणी करुन आवश्यक त्या नोंदी करण्यात आल्या. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी पीक नुकसानीबाबत आपली माहिती व अडचणी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या.ओ
महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त पाहणीमुळे प्रत्यक्ष शेतातील परिस्थितीची नोंद घेण्यास मदत होत असून, शासनाच्या नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.