सोलापूर – पार्क मैदान येथे झालेल्या शालेय बॉक्सिंग स्पर्धेत एस. एस. ए. उर्दू हायस्कूल ॲंड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले.
१७ वर्षांखालील मुलांच्या गटात अब्दुल मुफिज वसीम बागवान ४७ किलो वजन गटात, यहया इलियास इनामदार ४८ किलो वजन गटात, करन सुधीर कलशेट्टी ५२ किलो वजन गटात, साद मस्तान किल्लेदार ६० किलो वजन गटात प्रथम आणि अब्दुल मुईज अहमद बागवान ४१ किलो वजन गटात द्वितीय क्रमांक पटकाविले. या खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
तसेच तायकांदो स्पर्धेत १९ वर्षाखालील मुलींमध्ये कहेकशा आरीफ ताडपत्री हिने ४१ किलो वजन गटात द्वितीय क्रमांक पटकाविले. या विद्यार्थ्यांना अ. रहीम शेख, आवेस मर्चंट आणि म. अलीम शेख यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांना मुख्याध्यापक रसूल चौधरी, उपमुख्याध्यापक इम्तियाज शाब्दी, पर्यवेक्षिका यास्मिन शेख व पर्यवेक्षक अल्ताफ कुमठे यांनी शुभेच्छा दिल्या.
——-
Post Views: 7