सोलापूर – सोलापूर येथील सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र महोत्सव सुसूत्रता मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार, १ ऑक्टोबर २०२६ रोजी मीठ गल्ली येथील श्री शिवानुभव मंगल कार्यालय येथे पार पडली. माजी अध्यक्ष श्रीशैल बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत आगामी नवरात्रोत्सव परंपरेनुसार उत्साहात, शांततेत आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्याचा निर्धार करण्यात आला. या सभेत आगामी वर्षासाठी मंडळाच्या नवीन कार्यकारिणीची बिनविरोध व सर्वानुमते निवड करण्यात आली असून, अध्यक्षपदी विजय पुकाळे तर सचिवपदी दत्तात्रय मेनकुदळे यांची निवड करण्यात आली आहे.
सामाजिक बांधिलकी जपत काटकसरीचा निर्णय
सभेच्या प्रारंभी श्री कामेश्वर गणपती व श्री तुळजाभवानी देवीच्या प्रतिमेचे पूजन करून आरती करण्यात आली. त्यानंतर मागील वर्षाच्या सभेचा आढावा व जमा-खर्च सचिव दत्तात्रय मेनकुदळे यांनी मांडला, ज्यास सभेने एकमुखाने मंजुरी दिली.
या वेळी शहरातील दुष्काळी परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत, महोत्सवातील अनावश्यक खर्च टाळून काटकसर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. तसेच मूक प्राण्यांसाठी पिण्याचे पाणी, चारा छावणी व हातपंप उभारणी यांसारख्या विविध विधायक व सामाजिक कामांच्या माध्यमातून मदत करण्याचा निर्धार नवरात्र मंडळाच्या वतीने करण्यात आला.
नूतन कार्यकारिणी:
अध्यक्ष: विजय पुकाळे
उपाध्यक्ष: मल्लिनाथ सोलापूरे, बाबा शेख
कार्याध्यक्ष: दिलीप चौधरी
सचिव: दत्तात्रय मेनकुदळे
सहसचिव: निलेश शिंदे
खजिनदार: चक्रपाणी गज्जम
मिरवणूक प्रमुख: राजू कणके, किसन गर्जे, अतिश देशेट्टी
प्रसिद्धीप्रमुख: दत्ता भोसले
सल्लागार: ब्रम्हदेव गायकवाड
बैठकीदरम्यान उपस्थितांच्या अडचणी समजून घेण्यात आल्या. तसेच पारंपरिक वाद्यांच्या निनादात, उत्साहात आणि शांततेच्या वातावरणात नवरात्र उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले.
या बैठकीस गणेश चिंचोळी, राजकुमार कणके, भगवान परळीकर, जक्कप्पा गायकवाड, बसवराज यैरटे, सुनील रसाळे, दत्तात्रय मेनकुदळे, श्रीशैल बनशेट्टी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी शहरातील विविध देवी देवालयांचे प्रतिनिधी, मंडळाचे आजी-माजी विश्वस्त, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 6