सोलापूर – शालेय शहर तायक्वांदो स्पर्धामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या रावजी सखाराम हायस्कूल ऑफ कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल सात पदकांची कमाई केली.
तायक्वांदो स्पर्धेत सानिका मिलिंद गायकवाड, सृष्टी संतोष शिंदे आणि आराध्या नंदू ओव्हाळ यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. तसेच कृष्णा अमोल वाघमारे, प्रणय सागर माने आणि वैष्णवी संतोष शिंदे यांनी रौप्यपदक तर शुभम पांडुरंग माने याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत कांस्यपदक प्राप्त केले. असे एकूण तीन सुवर्णपदके, तीन रौप्यपदके आणि एक कांस्यपदक मिळवत विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा कायम राखली.
सुवर्णपदक मिळविणाऱ्या खेळाडूंना आगामी ४ व ५ ऑक्टोबर रोजी पुणे येथे होणाऱ्या विभागीय तायक्वांदो स्पर्धेत सोलापूर शहराचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.
या खेळाडूंना क्रीडा शिक्षक अझहर शेख तसेच तायक्वांदो प्रशिक्षक सोमनाथ बनसोडे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाचे कार्याध्यक्ष संजीव पाटील, स्कूल कमिटी सदस्य केतनभाई शहा, धीरज जवळकर, माधुरीताई पाटील, विद्यालयाचे प्राचार्य भारत केत आदींनी यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.
———
Post Views: 5