सोलापूर – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वतीने आयोजित आंतरराज्य १९ वर्षांखालील महिला टी-२० स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात सोलापूरच्या दोन मुलींची निवड झाली आहे. भक्ती गणेश पवार आणि स्नेहा संतोष शिंदे अशी या दोघींची नावे असून, या दोघी केरळ येथे होणाऱ्या या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
दोघींच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन रणजीतसिंह मोहिते-पाटील, अध्यक्ष दिलीप माने, व्हाईस चेअरमन श्रीकांत मोरे-पाटील, संयुक्त सचिव खासदार धैर्यशील मोहिते पाटील व चंद्रकांत रेम्बर्सो, खजिनदार संतोष बडवे, महिला निवड समितीच्या चेअरमन किरण मणियार, स्नेहल जाधव, सारिका कुरनूरकर आणि मानसी जाधव यांनी दोघीना पुढील राष्ट्रीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
——-





















