पिलीव – माळशिरस तालुक्यासह पिलीव परिसरात यंदा भिषण दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत .पावसाळा संपत आला तरीही पावसाचा पत्ताच नाही .यामुळे सध्या पिलीव परिसरात ऑक्टोबर महिन्यातच पाण्याची टंचाई जाणवु लागली असुन पाऊस नसल्यामुळे चाऱ्याचे दर प्रचंड भडकले आहेत. मकेचा दर 2000 ते 2500 रुपये प्रती गुंठठायापर्यत पोहचला म्हणजे प्रति एकर 80,000 ते 90,000 हजार रुपयांपर्यंत ओल्या मकेचा वैरणीचा दर पोहचला आहे. ही भिषण परिस्थीती ऑक्टोबर महिन्यातच आहे मग मार्च, एप्रिल, मे महीना आणी त्यानंतर पाऊस कधी होणार तोपर्यंत पशुधन जगवणार कसे पाऊस नसल्याने चारा तर मिळणार का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर वाढ न झालेला ऊस चाऱ्यासाठी वापर करायचा तर तोही 5000 ते 6000 रुपये प्रती गुंठठायापर्यत पोहचला आहे. ही चाऱ्याची अवस्था त्यातच पेंड, बार्ली याचे दर पाहता पशुपालकांना खर्चाचा ताळमेळच बसेना एकीकडे दुधाचा दर थोडाफार वाढला आहे तर वैरणीचै दर व पशुखादयाचे दर अक्षरश गगनाला भिडले आहेत. दुष्काळी परिस्थिती एकतर चारा मिळणे मुश्कील आणी दुसरीकडे आताच दराने कंबरडे मोडले मग चारा आणायचा तरी कुठून ऑक्टोबर पासून पुढच्या वर्षी जुन महिन्यापर्यंत दुष्काळी परिस्थितीत चारा कोठुन आणायचा आताच दर गगनाला भिडलेत मग परत उन्हाळ्यात दराची अवस्था काय असेल अशी पशुपालकांत धास्ती आहे. याचा दुग्ध व्यवसायावर परीणाम होत आहे.दुष्काळी परिस्थितीचे सावट यामुळे पशुपालक आताच बाजारात नेऊन पशुधन विकु लागला माञ बाजारात विक्रीसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात पशुधन येऊ लागल्यामुळे किमतीत प्रचंड मोठी घसरण झाली आहे. आताच एवढी विदारक परिस्थिती आहे मग पुढील तीन _ चार महीन्यात प्रचंड भिषण परिस्थीती निर्माण होणार आहे. यामुळेच पशुपालकामधये प्रचंड धास्ती निर्माण झाली आहे. दुष्काळाचे सावट चाऱ्याचे दर गगनाला भिडल्या मुळे दुध व्यवसाय सध्या चांगलाच अडचणीत आला आहे. चौकट _ दुष्काळाचे सावट वैरणीचे दर गगनाला भिडलेत, वैरणही मिळेना जनावरे विकायला नेली तरीही बाजारात दर प्रचंड कमी झाले आहेत. लाख रुपयांपर्यंत किंमत असणारी चांगली गाय बाजारात साठ ते सत्तर हजारालच विकावी लागत आहे ._ स्वप्नील गोंजारी, _ दुग्ध व्यवसायीक शेतकरी, कुसमोड.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...























