सोलापूर – आंतरशालेय नेहरू हॉकी स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलांच्या वयोगटात मॉडेल पब्लिक स्कूलने विजेतेपद पटकाविले.
अंतिम सामन्यात स्कूलने सुयश सेंन्ट्रल स्कूलचा १-० ने पराभव केला. या यशाबद्दल शाळेचे संस्थापक अध्यक्ष ए.डी. जोशी, सचिव अमोल जोशी, श्री साई महिला प्रतिष्ठानच्या सचिवा सायली जोशी, मुख्याध्यापिका अदिती कुलकर्णी व ममता बसवंती यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
विजयी संघ : (कर्णधार) प्रज्वल मसळी, (गोलकीपर) वेदांत पाटील, ओमकार कारले, कौस्तुभ दंतकाळे, विराट चव्हाण, अहद नदाफ, सुभान शेख, प्रेम उदावंत, सिद्धांत बगले, अमान शेख, श्री बिज्जरगी, वरद पांढरे, शिवसमर्थ चाबुकस्वार, सर्वेश बिराजदार, राज गवंडी.
—–























