पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील पिलीव पशुवैद्यकीय दवाखान्या अंतर्गत येणाऱ्या पिलीव, सुळेवाडी ,झिंजेवस्ती या गावातील सर्व जनावरांची ऑनलाईन नोंदणी करावी तसेच सर्व जनावरांना लसीकरण करावे यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर कैलास पुकळे यांनी मार्गदर्शनपर बैठकीचे आयोजन केले होते .या बैठकीस पिलीव पंचायत समिती गणाचया सदस्या नम्रता पुकळे तसेच या भागातील खाजगी पशुसेवा देणारे सर्व डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळेस पशुधनाचे नियमीत लसीकरण, ऑनलाईन नोंदणी, आरोग्याची काळजी, विविध आजारावरील प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत, तसेच पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा लाभ पशुपालकांपर्यत पोहचिवणे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन पर चर्चा यावेळी करण्यात आली .
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...





















