सोलापूर – शालेय शहर बॉक्सिंग स्पर्धेत कै. विलासचंद्र मोतीचंद्र मेहता माध्यमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना क्रीडा प्रमुख अमित कोर्टीकर, ग्रँड मास्टर युवराज गायकवाड, प्रशिक्षक संदीप गायकवाड, सम्राट गायकवाड व अभिजीत गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे शाळा समिती अध्यक्ष अनिल बरवे, नियामक मंडळ सदस्य सुरेशबाबू मंकणी, मुख्याध्यापिका श्रुती बागेवाडी, पर्यवेक्षिका मीनाक्षी भाटवडेकर, यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
विविध वयोगटातील कामगिरी : मुली : साक्षी श्रीशैल बिदनुरे, वैष्णवी गोविंद चव्हाण, पूर्वा गायकवाड (प्रथम), अनुष्का प्रदीप देवकते, ईश्वरी हडपद, साक्षी लांडगे, अवनी कोरे, अर्चना कोरे, वैष्णवी ढसाळ, जानवी राठोड ( द्वितीय), भक्ती सगेल, निकिता बिराजदार (तृतीय), –
मुले : लक्ष्मीकांत जवळेकर, प्रणव व्यवहारे, वैभव पालापुरे, प्रणव सातलगावकर, दक्ष वढारे, क्षितिज ताठे, रुद्र धिमाधिमे, शिवतेज बाबर ( द्वितीय), वेदांत साळुंखे, धीरज पाटील, गोकुळ पिल्ले ( तृतीय).
—–=























