बार्शी – तालुक्यातील काळेगाव ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामस्थांना स्वच्छ पाणीपुरवठा उपलब्ध करुन देण्यासाठी पाण्याच्या टाकीजवळ बसविण्यात आलेला ऑटोमॅटिक वॉटर डिस्पेंसरचा क्वाईन बॉक्स चोरट्याने चोरी करुन नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी काळेगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका रेखा चंद्रकांत गोदकर (वय ४१) यांनी वैराग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, काळेगाव ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामस्थांना स्वच्छ पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांच्या ठरावानुसार श्री समर्थ इंटरप्रायजेस, शेलगाव (मा.), ता. बार्शी यांच्याकडून २४ सप्टेंबर २०२५ रोजी काळेगाव येथील पाण्याच्या टाकीजवळ ऑरो प्लॅन्ट बसविण्यात आला होता. प्लॅन्टच्या देखभालीची जबाबदारी पाणीपुरवठा विभागातील बालाजी श्रीमंत घायतीडक यांच्याकडे सोपविण्यात आली होती. दरम्यान, २५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी नेहमीप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालयात आल्यानंतर पाणीपुरवठा विभागातील बालाजी घायतीडक यांनी पाण्याच्या टाकीजवळ बसविण्यात आलेला ऑरो प्लॅन्टचा क्वाईन बॉक्स जागेवर नसल्याचे ग्रामसेविका गोदकर यांना सांगितले. आजूबाजूच्या परिसरात क्वाईन बॉक्सचा शोध घेतला. मात्र, तो मिळून आला नाही. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध फिर्याद देण्यात आली आहे.
Post Views: 4