सोलापूर – बंगलोर येथे होणाऱ्या आशियाई मास्टर्स स्विमिंग चॅम्पियनशिपसाठी येथील ओंकार गायकवाड यांची २०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात निवड झाली आहे.
या प्रतिष्ठित स्पर्धेत आशिया, ओशनिया आणि मध्य पूर्व खंडातील ५३ देशांचे खेळाडू सहभागी होणार आहेत. ओंकार यांनी यापूर्वीही राष्ट्रीय व राज्य पातळीवर अनेक पदके पटकावली आहेत. ते सध्या सोलापूर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात सेवेत आहेत. त्यांचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश जाधव, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, पोलीस उपअधीक्षक शिरीष हुंबे, मनीषा गायकवाड, मरगु जाधव, कार्यालय अधीक्षक अशोक चव्हाण, अजित सोनार, सुवर्णा कांबळे, भक्तराज जाधव व नागनाथ जाधव आदींनी अभिनंदन केले.
—–























