बार्शी – ्ला्यन्स क्लब बार्शी राॕयल व राधेकृष्ण बहुउद्देशीय मंडळातर्फ गोकुळाष्टमीनिमित्त टाकाऊ वस्तूंपासून भेटकार्ड बनवणे कार्यशाळा महात्मा फुले विद्यामंदिर येथे घेण्यात आली. या कार्यकाळामध्ये पहिली ते सातवी पर्यंतच्या ४५० विद्याथ्यांनी सहभाग घेतला. उत्कृष्ट भेटकार्ड बनवणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी, भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या उपस्थित सन्मानित करण्यात आले.
विजेते विद्याथ्यांचे नावे- सयान समीर सय्यद, सुयोग अमोल मारकड, साद अन्नवरवर आत्तार, शिवांश शंकर घुले, सर्वज्ञ शिरिशकुमार सांळुखे, नूरमोहमद जमिल शेख ,शिवम संजय गाडेकर. यावेळी लायन्स क्लब बार्शी रॉयलचे सदस्य व राधेकृष्ण बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष उदयकुमार पोतदार, वृक्षप्रेमीं गायक सुनिल फल्ले, मुख्याध्यापक जावळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार देशमुख यांनी केले.