Wednesday, October 7, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जलजीवन मिशनच्या पाइपलाइनला भीषण आग

तरुण भारतbyतरुण भारत
October 7, 2026
in crime
0
जलजीवन मिशनच्या पाइपलाइनला भीषण आग
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
मोडनिंब – माढा तालुक्यातील मोडनिंब शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी जलजीवन मिशन योजनेंतर्गत आणून ठेवण्यात आलेल्या पाइपलाइनच्या साठ्याला मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. पोलिस ठाण्यासमोरच सुमारे तासभर ही आग धुमसत होती. आगीची तीव्रता एवढी होती की, सुमारे २०० ते २५० मीटरच्या परिसरात उष्णतेची तीव्र झळ जाणवत होती. या घटनेत पाइपलाइनचा मोठा साठा जळून खाक झाला असून, परिसरातील झाडेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. लगतच असलेला आर.ओ. प्लांट, शेडचे मोठे नुकसान झाले. सोलरचा ड्यूल पंपाचे मोठे नुकसान झाले. मोडनिंब शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी जलजीवन मिशन योजनेंतर्गत १२ कोटी ४६ लाख ९८ हजार रुपयांची योजना मंजूर आहे. या योजनेचे काम जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. अनेक वेळा विरोधामुळे हे काम थांबविण्यात आले होते. मागील महिन्यात आलेल्या विधानसभेच्या अंदाजपत्रक समितीने या पाईपची पाहणी करून ठेकेदाराची खरडपट्टी काढली होती. त्यानंतरही झालेल्या दुर्लक्षा मुळे आजची घटना घडल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे. मात्र, पाइपलाइनचा साठा मोकळ्या जागेत ठेवण्यात आल्याने तसेच त्याच्या सुरक्षिततेकडे संबंधितांकडून पुरेसे लक्ष देण्यात आले नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे काळे लोट पसरले होते. सुमारे पाच ते सहा किलोमीटर अंतरावरूनही धूर दिसत असल्याने घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. आग आटोक्यात आणण्यासाठी विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशामक वाहनास पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली.दरम्यान, आगीच्या ज्वाळा परिसरातील महावितरणच्या वीजतारांपर्यंत पोहोचल्याने तारांचेही नुकसान झाले. घटनास्थळाजवळच ट्रान्सफॉर्मर असल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने ट्रान्सफॉर्मरचे मोठे नुकसान झाले नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पाइपलाइनचा मोठ्या प्रमाणात साठा जळाल्याने शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीतून उभारण्यात येत असलेल्या योजनेचे नुकसान झाले आहे. या घटनेची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थातून होत आहे. अंगणवाडी ची इमारत नादुरुस्त झाल्याने गणपती मंदिराच्या सभामंडपातच अंगणवाडी भरवण्यात येते. दुपारनंतर ही आग लागल्याने मोठा धोका टळल्याचे स्थानिकांनी सांगितले.
लाखोंचे नुकसान

आगीत शासनाच्या पाइपचे सुमारे २० लाख रुपये, गणपती मंदिरातील गाभारा, सभामंडप व इतर साहित्याचे सुमारे २० लाख रुपये, तर ग्रामपंचायतीच्या पाणी फिल्टर, ओपन जिम व सोलर सिस्टिमचे अंदाजे १२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नुकसानीचा अंतिम आकडा पंचनामा व पाहणीनंतर स्पष्ट होणार आहे.

आग लागून जलजीवन मिशनच्या कामासाठी ठेवण्यात आलेल्या पाईप जळाल्या आहेत. याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येणार आहे. पंचनामा झाल्यानंतर झालेल्या नुकसानीची आकडेवारी समोर येईल.
– गायधनकर व्ही. बी.
उपभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग बार्शी
मोडनिंबपासून सुमारे ५ किलोमीटर अंतरावर होतो. त्या ठिकाणाहूनही मोडनिंबच्या दिशेने आकाशात मोठमोठे धुराचे काळे लोट स्पष्ट दिसत होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात धूर दिसत असल्याने काहीतरी दुर्घटना घडल्याचे जाणवत होते. नंतर चौकशी केल्यानंतर पाइपलाइनच्या साठ्याला आग लागल्याचे समजल्याचे उपस्थित नागरिकांनी सांगितले.
Post Views: 16
Previous Post

तुळशीत ‘शिरपूर पॅटर्न’च्या धर्तीवर नाला सरळीकरणाला सुरुवात

Next Post

माधवनगर येथे 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

माधवनगर येथे 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

ताज्या बातम्या

जयभारत समाजसेवा व नवरात्र महोत्सव मंडळाची अध्यक्ष पदी रमेश धनुरे

जयभारत समाजसेवा व नवरात्र महोत्सव मंडळाची अध्यक्ष पदी रमेश धनुरे

October 7, 2026
विश्वजीत रोलर स्केटिंग क्लासेस खेळाडू यशराज रोडे याची शालेय विभागीय स्केटींग स्पर्धेसाठी निवड

विश्वजीत रोलर स्केटिंग क्लासेस खेळाडू यशराज रोडे याची शालेय विभागीय स्केटींग स्पर्धेसाठी निवड

October 7, 2026
हुतात्मा स्मृती मंदिराचा होणार आता कायापालट

हुतात्मा स्मृती मंदिराचा होणार आता कायापालट

October 7, 2026
‘नेमकं MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे की राजकीय?’, राजेंद्र राऊतांचा सवाल, रोहित पवारांवर नावानिशी निशाणा

‘नेमकं MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे की राजकीय?’, राजेंद्र राऊतांचा सवाल, रोहित पवारांवर नावानिशी निशाणा

October 7, 2026
२५ वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; अष्टविनायक नगरमध्ये सभामंडपाचे भूमिपूजन

२५ वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; अष्टविनायक नगरमध्ये सभामंडपाचे भूमिपूजन

October 7, 2026
महात्मा गांधी जयंती साजरी

महात्मा गांधी जयंती साजरी

October 7, 2026
मेनोपॉज (रजोनिवृत्ती) काळातील महिलांच्या आरोग्यविषयक समस्या

मेनोपॉज (रजोनिवृत्ती) काळातील महिलांच्या आरोग्यविषयक समस्या

October 7, 2026
पावसासाठी ५१ नद्यांच्या पवित्र जलाने शिवलिंगांचा जलाभिषेक

पावसासाठी ५१ नद्यांच्या पवित्र जलाने शिवलिंगांचा जलाभिषेक

October 7, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1312743

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!