सोलापूर -अज्ञात कारणावरून एका 21 वर्षीय तरुणाने घरातील छताला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सत्तर फूट रोड परिसरातील माधव नगरात सोमवारी सायंकाळी सात वाजता उघडकीस आली.
संतोष नागेश इम्रापुरी (वय 21 वर्ष, रा. माधवनगर साईबाबा मंदिर समोर ,सोलापूर) असे त्या मयत तरुणाचे नाव आहे. त्याने राहत्या घरात गळफास घेतला असल्याचे सोमवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास आढळून आले.फासातून सोडवून नातेवाईकांनी ही खबर सदर बाजार पोलिसांना दिली. पोलीस हवालदार जी एल काळे यांनी घटनास्थळी पोहोचून सदरचा मृतदेह येथील शासकीय रुग्णालयात रात्री सव्वा आठ वाजता दाखल केला असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.