मोहोळ – भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांच्या सूचनेनुसार आणि पक्षाचे संघटनात्मक कार्य अधिक गतिमान करण्यासाठी नांदेड येथील पक्षाचे कार्यकर्ते गजानन जोशी यांची ‘मराठवाडा विभागीय प्रसिद्धी प्रमुख’ पदी तात्काळ प्रभावाने निवड करण्यात आली आहे.
या महत्त्वपूर्ण जबाबदारीमुळे मराठवाडा विभागातील पक्ष संघटन, शासनाचे लोककल्याणकारी निर्णय आणि विविध उपक्रम जनमाणसात प्रभावीपणे पोहोचण्यास मोठी मदत होणार आहे.
भाजपा महाराष्ट्र प्रदेश माध्यम कक्ष प्रमुख गोविंद येतयेकर यांनी या निवडीची घोषणा केली असून,श्री.गजानन जोशी यांच्या या नियुक्तीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन होत आहे. गजानन जोशी हे यापूर्वी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य म्हणून कार्यरत होते…