वैराग – पर्यावरणपूरक गणेशोत्सव आणि सामाजिक उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल माढा येथील श्री जगदंबा गणेश उत्सव सांस्कृतिक व सामाजिक क्रीडा मंडळ, कसबा पेठ या मंडळाला सोलापूर ग्रामीण पोलिसांचा प्रतिष्ठित ‘जिल्हास्तरीय गणराया अवॉर्ड २०२६’ जाहीर झाला आहे.
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे व अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्या उपस्थितीत दिनांक ०८ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस मुख्यालयातील संवाद हॉलमध्ये हा गौरव सोहळा पार पडला. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्या हस्ते मंडळाचे अध्यक्ष महेश भांगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
अवाजवी खर्च व प्रदूषण टाळून शैक्षणिक साहित्य वाटप, वृक्षारोपण व सामाजिक संदेश देणारे उपक्रम राबवल्याबद्दल मंडळाची उपविभाग स्तरावर निवड करण्यात आली. या प्रसंगी माढा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रोहित शिंदे यांच्यासह पोलीस अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.