पिलीव – ओंकार साखर कारखाना परिवाराने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात बंद पडलेले किंवा मोडकळीस आलेले साखर कारखाने ताब्यात घेऊन सुरु करुन त्या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर देणयाचे काम केले आहे. गेल्या आठ वर्षांपासून ओंकार परिवाराने शेतकरयांन बरोबरच अधिकारी, कर्मचारीवर्ग, वाहतूकदार यांचे हीत जोपासले आहे. ओंकार साखर परिवारातील कामकाजात सुसुञता यावी याच उद्देशाने ओंकार परिवाराच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी तेजस्विनी बर्गे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचा सन्मान ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेअरमन बाबुराव बोत्रेपाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संचालक ओमराजे बोञे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...





















