बार्शी – शहरातील लातूर – कुडुवाडी बाह्मबळण रस्त्यावर नागोबाचीवाडी (ता. बार्शी) शिवारात स्पा सेंटरच्या नाबाखाली कुंटणखाना सुरु असल्याची माहिती पोलिसांना समजताच छापा टाकला असताना दोन महिलांची सुटका करुन दोघाजणांवर बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
डिलक्स स्पा सेंटरचा व्यवस्थापक बाबाभाई खाजाबाई चौधरी (वय ३० वर्षे रा. रा. नंदनवन आपार्टमेंन्ट, केशवपार्क कंम्पाऊन्ड, कतग्राम, सुरत (गुजरात), मालक आकाश काशीद रा. बार्शी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत ही घटना शनिवार (ता १०) रोजी रात्री सव्वा अकराच्या दरम्यान उघडकीस आली.
बार्शी तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. ३२५/२०२६ भारतीय न्याय संहीता कलम 143 (2), 144(2), 3(5), सह अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा सन 1956 चे कलम 3,4,5,6 प्रमाणे प्रमाणे दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून फिर्याद पोलीस हवालदार सुर्यकांत जाधव, अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष, सोलापूर यांनी दिली.
परराज्यातील दोन महिलांकडून बाह्यवळण रस्त्यावरील डिलक्स स्पा सेंटरमध्ये कुंटणखान्याप्रमाणे वापर करुन वेश्याव्यवसाय करणेकरीता बोलावून घेवून त्यांना पैशाचे आमिष दाखवून त्यांचेकडून वेश्या व्यवसाय करवून घेवून त्यांच्या येणा-या कमाईवर स्वतःची उपजिवीका करीत असताना मिळून आल्याने माझी त्याचे विरुध्द सरकारतर्फे भारतीय न्याय संहीता कलम 143 (2), 144(2), 3(5), सह अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा सन 1956 चे कलम 3,4,5,6 प्रमाणे फिर्याद आहे, असे म्हटले आहे. तपास नियत्रंण कक्ष सोलापूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक महादेव चव्हाण करीत आहेत.