सोलापूर : नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वानिमित्त सोलापूर शहराचे आराध्य दैवत श्री रूपाभवानी देवी मंदिर येथे सोलापूरचे महापौर श्री. विनायक कोंड्याल व धनश्री
कोंड्याल यांनी आज श्री देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांनी सोलापूर शहरातील नागरिकांच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि कल्याणासाठी प्रार्थना केली.
याप्रसंगी श्री रूपाभवानी देवस्थानचे ट्रस्टी श्री. मल्लिनाथ मसरे यांनी महापौर विनायक कोंड्याल व धनश्री कोंड्याल यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला. यावेळी देवस्थानच्या वतीने नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थांबाबतही चर्चा करण्यात आली.
महापौर विनायक कोंड्याल यांनी मंदिर परिसरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेची प्रत्यक्ष पाहणी केली. भाविकांची सुरक्षितता, मंदिर परिसरातील देखरेख आणि गर्दीच्या काळात सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
देवीच्या कृपेने प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो, तसेच सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा आणि गती मिळो, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी देवस्थानचे ट्रस्टी मल्लिनाथ मसरे, नागेश सरगम, प्रकाश वाले, नगरसेवक अक्षय आजीखाने, नगरसेवक ज्ञानेश्वर म्याकल, हेमंत पिंगळे, सारंग मसरे, मनीष मसरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.