बार्शी – सोलापूर जिल्हा परिषदेचे कार्यकुशल मुख्य कार्यकरी अधिकारी कुशल जैन यांनी नुकताच दुष्काळी भागाचा दौरा केला. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर २ उपळाई (ठों) शाळेस अचानक भेट देऊन शाळेतील भौतिक सुविधांचा आढावा घेतला. या दरम्यान शाळेतील गुणवत्तापूर्ण वातावरण, शाळेचा परिसर या बाबीचे विशेष कौतुक केले. यावेळी त्यांनी मुलांसाठी बेंच, interactive बोर्ड, नवीन शौचालय, शाळेची दुरुस्ती व मैदान सपाटीकरण या सर्वच बाबी तातडीने उपलब्ध करुन घ्याव्यात, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपळाई गावचे सुपुत्र श्री. दिपक वैद्य, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी गजानन बाजड, विस्तार अधिकारी बालाजी नाटके, केंद्रप्रमुख श्रीराम आगलावे, माजी सरपंच विजय बापू ठोगे, माजी उपसरपंच संदीप बोटे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, अधिकारी,पदाधिकारी,शाळेचे मुख्याध्यापक अनिल काळे व उपशिक्षक उपस्थित होते.
Post Views: 7