सोलापुर : दलित साहित्य निर्मिती सर्वप्रथम महाराष्ट्रात झाली. त्यानंतर देशाच्या विविध भागातून दलित साहित्य लिहिले गेले. आजच्या परिस्थितीत खरच परिवर्तन झाले कां? याचे चिंतन करून आनखी काम करण्याची गरज आहे असे मत हिंदी भाषेतील ज्येष्ठ लेखक डाॅ. दामोदर खडसे यांनी व्यक्त केले.
डाॅ. डी. वाय. पाटील विद्यापीठ आणि ‘लोकशाहीसाठी समंजस संवाद’ यांच्यावतीने ‘महात्मा फुले- डाॅ. बाबासाहेब आंबेडकर प्रेरणा सन्मान सोहळा’ कुलपती डाॅ. पी. पी. पाटील यांचे हस्ते व डाॅ.दामोदर खडसे यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, ‘लोकशाहीसाठी समंजस संवाद’चे प्रमुख सल्लागार विजय जाधव उपस्थित होते.
याप्रसंगी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते दत्ता गायकवाड यांचा स्मृतिचिन्ह, फुले पगडी, शाल, पुष्पगुच्छ देऊन कुलपती डाॅ. पी. पी. पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ लेखिका उर्मिला पवार (मुंबई), ज्येष्ठ पत्रकार,लेखक अशोक गोपाल (पुणे), सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रेय काळेबेरे (पुणे) यांचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना दत्ता गायकवाड म्हणाले की, देशात सध्या अराजक व गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे अशा स्थितीत डाॅ. बाबासाहेबांच्या संविधानावरच देश वाचू शकेल.कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे, सामाजिक कार्यकर्ते सुधीर चंदनशिवे, वरिष्ठ लेखाधिकारी श्रद्धा गायकवाड, सोनकवडे गुरुजी ट्रस्टचे प्रमुख लक्ष्मीदास सोनकवडे, ज्येष्ठ पत्रकार दयानंद माने, प्रा.डाॅ. वनिता वनिता सावंत- चंदनशिवे, भाग्यश्री अभ्यंकर, शाहू काटे, सूर्यमणी गायकवाड, एन.डी. गायकवाड आदींसह अनेक जण उपस्थित होते.
Post Views: 21