सोलापूर – मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातर्फे २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सोलापूर स्थानकावर ‘स्टेशन महोत्सव’ साजरा करण्यात आला. या महोत्सवाच्या माध्यमातून सोलापूर स्थानकाचा समृद्ध वारसा, ऐतिहासिक महत्त्व आणि भारतीय रेल्वेचा गौरवशाली इतिहास अधोरेखित करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन सोलापूर रेल्वे स्थानकावर कार्यरत असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.
याद्वारे स्थानकाची स्वच्छता राखण्यासाठी आणि प्रवाशांसाठी एक उत्तम वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी विविध विभागांचे अधिकारी, रेल्वे कर्मचारी आणि प्रवासी उपस्थित होते. केक कापून हा उत्सव अधिक उत्साहात साजरा करण्यात आला.
यामध्ये दररोज थांबणाऱ्या ७६ गाड्या यामध्ये (३८ जोड्या) आहेत. दररोज हाताळले जाणारे सरासरी प्रवासी हे १९,१८८ इतके आहेत. दररोजचे सरासरी उत्पन्न सुमारे ५० लाख रुपये होते. दररोजची सरासरी बाह्य पार्सल वाहतूक ही २०९ युनिट्स इतकी होते. पार्सल सेवेतून मिळणारे दररोजचे सरासरी उत्पन्न सुमारे ५१,००० रुपये आहे. दररोज हाताळल्या जाणाऱ्या मालवाहू गाड्या या रेक्स (ज्यामध्ये २२ येणाऱ्या आणि १ बाहेर जाणारी मालवाहू गाडी समाविष्ट आहे)
‘स्टेशन महोत्सव’ उत्सवाच्या निमित्ताने, या स्थानकाच्या ऐतिहासिक प्रवासाची आठवण जागृत करण्यासोबतच, प्रवाशांच्या सेवेतील आणि प्रादेशिक विकासाला हातभार लावण्यातील त्याच्या निरंतर भूमिकेचा गौरव करण्यात आला.
























