सोलापूर – शालेय शहर क्रीडा स्पर्धांमध्ये नेहरूनगर येथील जय जवान जय किसान मुलांची सैनिकी शाळा व ज्युनिअर कॉलेजने खो-खो व सेपाक टकरा स्पर्धेत विजेतेपद पटकावित तिहेरी मुकुट संपादला. तसेच मैदानी स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील यशात मानाचा तुरा रोवला.
१४ वर्षांखालील मुलांच्या शहर खो-खो स्पर्धेत त्यांनी दमाणी प्रशालेचा ७ गुणांनी पराभव करून दिमाखदार विजेतेपद पटकावले. या सामन्यात वेदांत चव्हाण आणि मोहम्मद मुजावर यांनी अष्टपैलू कामगिरी केली.
१४ व १७ वर्षांखालील मुलांच्या सेपाक टकरा स्पर्धेतही शाळेच्या संघांने सोशल प्रशालेच्या संघांवर मात करून विजय मिळवला. संघास
महेश चव्हाण, रवी चव्हाण आणि सदा गुजले यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे संस्थेचे अध्यक्ष सुभाष चव्हाण, प्राचार्य रवींद्र चव्हाण, कमांडट अशोक, जाधव, मुंडे यांनी अभिनंदन केले.
विजयी खो-खो संघ : यश सासवे, रंजीत कोळी, रामेश्वर हिरापुरे, ऋषभ काळे, हर्षवर्धन जाधव, स्वराज्य डोके, श्रेयश चव्हाण, विराज तरंगे, संविधान सरवदे, आर्यन राठोड, हर्षद देशमाने, युवराज शाहरुख, पृथ्वीराज राठोड, वेदांत चव्हाण. मोहम्मद मुजावर.
विजयी सेपाक टकरा : १४ वर्षांखालील संघ : युवराज साठे, प्रद्युम्न भालेकर, शिवतेज काळे, विराट गिरे, आदित्य चाबुकस्वार.
१७ वर्षांखालील संघ: प्रेम बिराजदार, अमित कोळी, अथर्व निकाळजे,आदर्श हिपळ्या, असद नदाफ.
मैदानी स्पर्धेतील कामगिरी: 17 वर्षाखालील मुले : 4 बाय 400 मीटर प्रथम (आदित्य कदम, आर्यन पाटील, शंभुराजे साळुंखे, युवराज शाहरुख, प्रथमेश ). भालाफेक : सुशांत साळुंखे (प्रथम ). थाळीफेक : सुशांत साळुंखे (द्वितीय ). पाच किलोमीटर चालणे : लक्ष्मण मेंदर्गे, (तृतीय). 19 वर्षाखालील मुले : भालाफेक : हर्षद चौरे (द्वितीय). क्रॉस कंट्री : मुरलीधर दिकोंडा (पाचवा).























