सोलापूर:राष्ट्रीय एकता दिवस (सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती) व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहिमेच्या औचित्याने सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने आज ३१ ऑक्टोबर रोजी १० किलोमीटर मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत तरुण-तरुणींसह स्थानिक नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.
ही मॅरेथॉन स्पर्धा सोलापूर-बार्शी रोडवरील नागनाथ मंदिर (अकोलेकाठी रोड) येथून सुरू होऊन वडाळा येथे समाप्त झाली. अकोलेकाठी आणि वडाळा येथील क्रीडा अकॅडमीमधील मुला-मुलींनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने भाग घेतला होता.
सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी स्वतः या मॅरेथॉनमध्ये धावून सहभाग नोंदवला. सर्व विजेत्या खेळाडूंना पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या हस्ते रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.सदर स्पर्धा सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोनि कुंदन गावडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या प्रसंगी अकोलेकाठी व वडाळा परिसरातील नागरिक, तसेच सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट –
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे: मुले गट: प्रथम क्र.: आदेश चव्हाण (पारितोषिक रु. ५,०००- व प्रमाणपत्र),द्वितीय क्र.: पांडुरंग सूर्यवंशी ( रु. ३,००० व प्रमाणपत्र,तृतीय क्र.: बाळासो पाटील ( रु. २,०००- व प्रमाणपत्र), मुली गट: प्रथम क्र.: रिया शिंदे – वय १३ वर्षे ( रु. ५,०००- व प्रमाणपत्र),द्वितीय क्र.: रिया खलाटे – वय ९ वर्षे ( रु. ३,००० – व प्रमाणपत्र),तृतीय क्र.: वृषाली बनसोडे ( रु. २,०००/- व प्रमाणपत्र).
Post Views: 40