बार्शी – फिर्यादी हे शेती तसेच ऊसतोडणीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सन २०२२-२३ च्या गळीत हंगामात ऊसतोडणी व वाहतुकीच्या कामासाठी त्यांनी मुकादम नामदेव मोहन कासार व विनोद आप्पाजी पवार, रा. बेलोरा, ता. पुसद, जि. यवतमाळ यांच्याशी आठ ऊसतोडणी जोड्या पुरविण्याचा करार केला होता. सदर करारानुसार फिर्यादी यांनी आरोपींना वेळोवेळी फोन पे, आरटीजीएस व रोख स्वरूपात एकूण ८ लाख ७४ हजार रुपये दिले होते. त्यानंतर सन २०२३-२४ च्या गळीत हंगामासाठी आणखी १ लाख ९५ हजार रुपये दिले. अशा प्रकारे आरोपींना एकूण १० लाख ६९ हजार रुपये दिल्याचे फिर्यादीच्या जबाबात नमूद आहे. मात्र, आरोपींनी ठरल्याप्रमाणे ऊसतोडणी मजूर पुरविले नाहीत. वारंवार संपर्क साधूनही आरोपींकडून समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही. तसेच पुढील हंगामात मजूर पुरविण्याचे व पैसे परत करण्याचे आश्वासन देऊनही त्यांनी ते पूर्ण केले नाही. त्यामुळे फिर्यादीने एकूण ६ लाख ४९ हजार ६७२ रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार करण्यात आली.
सदर प्रकरणी फिर्यादीच्या जबाबावरुन करमाळा पोलीस ठाण्यात आरोपी नामदेव मोहन कासार व विनोद आप्पाजी पवार यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड. अनिकेत सहदेव गुंड यांनी न्यायालयीन रणनीती व कुशल युक्तिवाद मांडून आरोपीची बाजू न्यायालयासमोर मांडली. त्यांच्या युक्तिवादाचा विचार करून न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला.
सदर प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड. अनिकेत सहदेव गुंड व ॲड. सौरभ विधाते यांनी काम पाहिले.
Post Views: 41