बार्शी – लायन्स क्लब बार्शी रॉयल व बार्शी शहर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘Run For Health 2026’ मॅरेथॉन स्पर्धेला बार्शी शहरातील नागरिक, युवक-युवती, विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सकाळी ५.३० वाजता शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथून या मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली. कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून बार्शीच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा तेजस्विनीताई कथले, प्रशांत कथले, लायन्स जिल्हा 3234 D1 चे जिल्हा गव्हर्नर PMJF ला. राजेंद्र शहा, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुहास जगताप, बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. गणेश कुंभार तसेच PDG लायन जितेंद्र दोशी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात झुंबा वॉर्मअपने झाली. त्यानंतर मान्यवरांचा सन्मान करुन मॅरेथॉन स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला.
या स्पर्धेचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरुकता निर्माण करणे, नियमित व्यायामाचे महत्त्व पटवून देणे तसेच व्यसनमुक्तीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवणे हा होता.
मॅरेथॉन स्पर्धेतील विजेते- पुरुष गट- प्रथम क्रमांक– पवन सुरवसे, द्वितीय– पंकज राठोड, तृतीय– विराज जाधवर
महिला गट- प्रथम क्रमांक– धारा जाधव, द्वितीय– प्रिया वायकुळे, तृतीय – श्रावणी कुंभार.
दोन्ही गटांतील विजेत्यांना अनुक्रमे प्रथम पारितोषिक ४,००० रुपये व ट्रॉफी, द्वितीय ३,००० रुपये व ट्रॉफी, तर तृतीय २,००० रुपये व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
ही सर्व पारितोषिके लायन्स क्लबचे सदस्य ला. संतोष गुळमिरे, ला. अमर काळे व ला. राहुल दोशी यांच्यावतीने प्रदान करण्यात आली.
या संपूर्ण कार्यक्रमासाठी डीवायएसपी श्री. सुहास जगताप, पोलीस निरीक्षक श्री. गणेश कुंभार, बार्शी पोलीस ठाण्याचे कादर तांबोळी, भगवान मल्टीस्टेट, सोलार, शिवाजी महाविद्यालय बार्शी, एनसीसी ग्रुप, शिक्षणशास्त्र विभागाचे कांबळे सर व त्यांची संपूर्ण टीम, शिखरे सर तसेच पोलीस सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या संपूर्ण टीमने मोलाचे सहकार्य केले.
भगवंत हॉस्पिटलचे डॉ. पडवळ यांच्यावतीने मॅरेथॉन स्पर्धेसाठी रुग्णवाहिका (ॲम्बुलन्स) तसेच दोन डॉक्टरांची वैद्यकीय टीम उपलब्ध करुन देण्यात आली होती. स्पर्धकांच्या आरोग्याची व सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी त्यांनी दिलेले हे सहकार्य अत्यंत मोलाचे ठरले.
पोलीस सेवा संघाच्या टीमने मॅरेथॉनच्या मार्गावरील वाहतूक व बंदोबस्ताची जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडली. जिजाऊ पब्लिक स्कूल, खांडवी येथील मिलीटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ढोल पथकामुळे संपूर्ण वातावरण उत्साहपूर्ण झाले.
बार्शी शहरातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभाग नोंदवून नागरिकांना प्रोत्साहन दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ला. राहुल दोशी व ला. गणेश भंडारी यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रत्येक ठिकाणी अतिशय चोख नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्था, धावपटूंची सुरक्षितता, वाहतूक नियोजन व आवश्यक सुविधांची जबाबदारी बार्शी शहर पोलीस प्रशासन आणि लायन्स क्लब बार्शी रॉयलच्या सर्व सदस्यांनी उत्तम प्रकारे पार पाडली.
लायन्स क्लब बार्शी रॉयलचे अध्यक्ष ला. मंगेश बागुल, सेक्रेटरी ला. दयानंद रेवडकर, प्रकल्प प्रमुख ला. राजेश खाडे, खजिनदार ला. उमेश जाधव व क्लबच्या सर्व सदस्यांनी या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.
या मॅरेथॉनच्या माध्यमातून आरोग्य, व्यायाम, व्यसनमुक्ती आणि सामाजिक एकतेचा संदेश बार्शीकरांपर्यंत पोहोचविण्यात आयोजकांना यश आले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहकार्य करणारे सर्व मान्यवर, पोलीस प्रशासन, भगवंत हॉस्पिटलचे डॉ. पडवळ व वैद्यकीय टीम, प्रायोजक, स्वयंसेवक, सहकार्य करणाऱ्या संस्था, विद्यार्थी, सहभागी धावपटू व लायन्स क्लबच्या सर्व सदस्यांचे लायन्स क्लब बार्शी रॉयल परिवारातर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
Post Views: 43