जयोस्तुते फाऊंडेशनच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त कामगार वस्तीतील ५१ गरजू कुटुंबांना दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी दिवाळी किटचे वाटप करण्यात आले. समाजातील आर्थिकदृष्ट्या गरजू कुटुंबांची दिवाळीही आनंदात साजरी व्हावी, या उदात्त हेतूने फाऊंडेशनच्या वतीने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमासाठी जयोस्तुते फाऊंडेशनचे सर्व सहकारी तसेच समाजातील दानशूर व्यक्तींनी आर्थिक सहकार्य करून सामाजिक बांधिलकी जपली. त्यांच्या सहकार्यामुळेच हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
या कार्यासाठी जयोस्तुते फाऊंडेशनचे वेणू नक्का, बलराम अल्लोळी, देवराज देसाई आणि लक्ष्मीकांत गोरांटला यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच माशाळ नगर येथील श्री वीरभद्रेश्वर किराणा शॉपचे मालक श्री. सोमनाथ कन्नूरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
“आपल्या आनंदात इतरांचाही आनंद सामावलेला असावा, हाच खरा दिवाळीचा उत्सव!” या भावनेतून जयोस्तुते फाऊंडेशनने सामाजिक सेवेची परंपरा जपत ११ व्या वर्धापन दिनानिमित्त हा उपक्रम राबविला. फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...






















