सायकल रायडर्स असोशिएशन संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी श्रीपूर येथिल सायकल रायडर्स संतोष लोंढे यांची एकमताने निवड करण्यात आली त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे . ही संघटना सदृढ आरोग्य व इंधन बचतीच्या संदेशा बरोबर देशभरात शांतता, समता , बंधुता या संत विचाराचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्धेशाने, कार्य करीत असून आरोग्य पर्यावरण पूरक प्रदूषण, राष्ट्रीय एकात्मता यासाठी कार्य करीत असल्याने या मोहीमेत विशेषतः तरुणांचा सहभाग लक्षणीय वाढला आहे . वेळापूर येथिल ज्येष्ठ सायकल रायडर्स अविनाश पोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या माळशिरस तालुक्यातील सायकल रायडर्सची बैठकीत संतोष लोंढे यांची निवड करण्यात आली . या बैठकीत सायकल रायडर्स असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांनी संतोष लोंढे यांना अध्यक्ष निवडीचे पत्र दिले. सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक तालुक्यात कार्य वाढावे व जास्तीत जास्त तरुण वर्ग सायकलिंग क्षेत्राकडे वळावेत व आरोग्य संपन्न भारत निर्माण व्हावा यासाठी सायकल रायडर्स असोसिएशन प्रयत्न करीत असल्याचे सुर्यकांत भिसे यांनी या प्रसंगी सांगितले . तर संतोष लोंढे यांनी गेली पाच वर्षांपूर्वी श्रीपुर मध्ये कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉक्टर यशवंत कुलकर्णी यांचे संकल्पनेतून पांडुरंग सायकल क्लब ची स्थापना झाली. मी उत्तम आरोग्या राहण्यासाठी सायकलिंग सुरू केले परंतू संघटनेची ध्येय धोरणे सर्वांपर्यंत पोहोचवणे साठी मी कायम प्रयत्नशिल राहीन . या बैठकीसाठी ज्येष्ठ सायकलिस्ट हनुमंत वाघ , सुदाम अंबुरे , महादेव माने , संताजी घोरपडे, सुरज कांबळे , दत्तात्रय घाडगे उपस्थित होते.
Views: 9