मोहोळ : मोहोळ तालुक्यातील तालुक्यातील मलिकपेठ येथील स्व.दिगंबर कसबे यांच्या प्रथम पुण्यस्मरणदिनानिमित्त होळकर आय हॉस्पिटल आणि नालंदा बहुद्देशीय सामाजिक संस्था मलिकपेठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरामध्ये १५० रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.या शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्यसौ विद्या कसबे आणि डॉ.शीतल होळकर यांच्या हस्ते करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व दिगंबर कसबे यांच्या प्रतिमेचे पूजन सैपन शेख,ग्रामपंचायत सदस्य नागेश हजारे तसेच माणिक साठे,विठ्ठल हजारे यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिरात एकूण १५० रुग्णांच्या डोळ्यांची मशीनद्वारे मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.होळकर हॉस्पिटलच्या डॉ.शीतल होळकर यांनी रुग्णांची तपासणी केली.या शिबिरास आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष हनुमंत कसबे,सैपन शेख,माणिक साठे,बाळासाहेब कसबे, नवनाथ आवारे,रजनीश कसबे, ग्रामपंचायत सदस्या विद्या कसबे, ग्रामपंचायत सदस्य नागेश हजारे,विठ्ठल हजारे, महादेव आवारे,दत्ता कसबे,तेजस कसबे, नागनाथ कसबे, प्रेम कसबे आदी उपस्थित होते.या शिबिरासाठी होळकर हॉस्पिटलच्या अझरुद्दीन शेख,ज्ञानेश्वर सिद्धरेड्डी,सारिका बनसोडे आदींनी परिश्रम घेतले.विविध पक्षाचे व सामाजिक संघटनेतील नेते मंडळी व पदाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थित होते.