जेऊर – करमाळ्यात उमेदच्या बचत गटा मधून दोन दिवसात एक लाख रुपयाहून अधिक रकमेची उलाढाल झाली असून अवघ्या सात-आठ बचत गटाच्या स्टॉलच्या माध्यमातून मोठी उलाढाल होत असून दिवाळीच्या शुभ प्रसंगी नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या बचत गटांनी स्वतःहून अनेक विविध वस्तूंची निर्मिती केली असून यातून उमेदच्या सहकार्यांमधून हे बचत गट अतिशय शक्तिशाली पणे कार्यरत आहेत. या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर करमाळा जेऊर रस्त्यावरील डाकघर च्या प्रांगणात या स्टॉलची उभारणी करण्यात आली होती. याचा शुभारंभ पंचायत समितीच्या सभापती पूजा ढेरे व उपसभापती अँड अजित विघ्ने यांच्या हस्ते स्टॉल वरील वस्तूच्या विक्रीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगरसेवक दीपक चव्हाण पंचायत समितीचे सदस्य स्वप्निल काळे, पंचायत समितीचे माजी सभापती शेखर गाडे, वकील संघाच्या माजी अध्यक्ष ॲड सविता शिंदे, तालुका अभियान व्यवस्थापीका सुषमा बिचुकले, तालुका व्यवस्थापक योगेश जगताप, विनोद गरड,चंद्रकांत माने, प्रभाग समन्वयक हनुमंत पवार, शुभम निमगिरे, प्रथमेश माने, अविनाश शेवाळे, विजया गायकवाड, ब्लॉक अँकर अभय पाटील, कृषी व्यवस्थापक महावीर नरसाळे, सागर पोरे, दादा शिंदे, नितिन झिंजाडे, आगार प्रमुख प्रमोद शिंदे , बँक ऑफ इंडिया मॅनेजर व संपूर्ण टिम, पंचायत समिती सर्व विभाग अधिकारी व पदाधिकारी आदि मान्यवर उपस्थित होते.
या वेळी विविध विभागाचे अधिकारी तसेच पदाधिकारी यांनी आवर्जून या महोस्तव ला भेट देऊन महिलांना मार्गदर्शन केले तसेच महिलांनी बनवलेली वस्तू ची खरेदी केली. उमेद च्या माध्यमातून आज महिला आपली ओळख निर्माण करून आर्थिक सामाजिक दृष्ट्या सक्षम होत आहेत.. उद्योजिका होत आहेत.
चौकट
यांनी घेतला होता सहभाग…
नवी दिशा स्वयं सहायता समूह-स्वाती आबा कुंभार (बीटरगाव श्री), श्री गणेश स्वयं सहायता समूह -आस्था दत्तात्रय वाघमोडे (बिटरगाव श्री), कन्हैया स्वयं सहायता समूह- सुदामती बबन ननदरगे (पोथरे), जय मल्हार स्वयं सहायता समूह -विजया अप्पा डोलारे (भालेवाडी), श्री गजानन स्वयं सहायता समूह -नेहा सौरभ शास्त्री (देवीचा माळ), शिवराय स्वयं सहायता समूह- वैशाली बंकट पवार (देवीचा माळ), जानवी महिला स्वयं सहायता समूह – , ललिता दत्तात्रय कुंभार (कुंभारगाव), शिवरत्न महिला स्वयं सहायता समूह-सोनाली नलवडे (देवळाली) , शीतल महिला स्वयं सहायता समूह- पुष्पा महादेव सरडे (चिखलठाण ),राजमाता महिला स्वयं सहायता समुह-अर्चना अशोक टकले (वरकुटे).
चौकट
तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती करमाळा (उमेद)यांच्या विद्यमानाने रुक्मिणी दिवाळी महोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवात लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे उमेशच्या माध्यमातून शेकडो बचत गटाच्या कुटुंबाला हातभार लाभत आहे यामध्ये सातत्याने वाढवत आहे यासाठी गटविकास अधिकारी डॉ अमित कदम हे सहकार्य करत आहे बचत गटातील सदस्यांनी अजून सक्रियपणे काम करणे आवश्यक आहे.
… सुषमा बिचकुले, व्यवस्थापिका, तालुका अभियान
Views: 17