सांगोला – देशभरात शांती, समता, बंधुता या संत विचारांचा प्रचार व प्रसार करणाऱ्या तसेच आरोग्य, पर्यावरण, प्रदूषण, राष्ट्रीय एकात्मता यासाठी कार्य करणाऱ्या सायकल रायडर्स असोसिएशनच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी सायकलिस्ट निलकंठ शिंदे यांची निवड करण्यात आली. सायकल रायडर्स प्रा.डॉ.प्रकाश बनसोडे, ऍड.राजेश्वरी केदार यांच्या अध्यक्षतेखाली सांगोला तालुक्यातील सायकल रायडर्सची बैठक पार पडली. या बैठकीत सायकल रायडर्स असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सुर्यकांत भिसे, सचिव सुरेंद्र पिसे यांनी निलकंठ शिंदे यांना नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी सुर्यकांत भिसे म्हणाले, सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक तालुक्यात या संघटनेचे कार्य वाढावे, जास्तीत जास्त तरुण सायकलिंग क्षेत्राकडे वळावा व आरोग्य संपन्न भारत निर्माण व्हावा यासाठी सायकल रायडर्स असोसिएशन प्रयत्न करीत आहे. निलकंठ शिंदे म्हणाले, दोन वर्षापूर्वी घुमाणं सायकल वारीत सहभागी होता आले. आपलें आरोग्य उत्तम राखण्यासाठी आज सायकलिंगची गरज आहे. याप्रसंगी सायकलिस्ट आलनदीप टापरे, बाळकृष्ण टापरे, प्रकाश खडतरे, संजय अनुसे, ब्रहदेव सुरवसे, राहुल पाटील, राजलक्ष्मी केदार, शैलेश चांडोले, दीपक काशीद, विठ्ठलपंत शिंदे, प्रथमेश गावडे उपस्थित होते.
Views: 19