पंढरपूर – जर एनडीआरएफची टीम आंबे येथील घटनास्थळी दाखल झाल्या नंतर केवळ दोन तासात पहिला मृतदेहाचा शोध घेऊ शकत असेल तर घटना घडल्यानंतर लगेचच येथे त्यांना पाचारण केले असते तर कदाचित चारही कामगारांचे जीव वाचविण्यात त्यांना आले असते असा सूर येथील नागरिकांतून सध्या चर्चिला जात आहे.
पंढरपूर तालुक्यातील आंबे या गावात रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास खोदलेल्या विहिरीचे मोजमाप करण्यासाठी हे सर्व कामगार विहिरीमध्ये उतरले असताना अचानक विहिरीच्या कठड्यावरील भराव कोसळून चारही कामगार ढिगाऱ्याखाली दबले गेले.
दरम्यान घटनेनंतर स्थानिक नागरिक,पोलिस,महसूल कर्मचाऱ्यांनी उपलब्ध सामुग्रीच्या मदतीने मदतकार्य सुरु केले. घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी तसेच अग्नीशामनदलाचे कर्मचारी यांच्या बरोबरच पोलिस देखील मदत कार्यासाठी पुढे सरसावलेले दिसत होते. मात्र त्यांचे प्रयत्न मनापासून असुन देखील तांत्रिकदृष्ट्या परिपुर्ण दिसत नव्हते. कारण प्रशिक्षित मनुष्यबळ नसल्याने ते तोकडे किंवा अपुरे वाटत होते.
कारण अशा प्रकारच्या घटना या आकस्मीत पणे घडत असतात. त्यामुळे या घटना घडल्यानंतर त्यासाठी जे मदत कार्य अपेक्षीत असते ते मदत कार्य वेळेत होणे आवश्यक असते. या बरोबरच मदतकार्य हाताळण्यासाठी प्रशिक्षित तसेच तज्ञ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपलब्धता त्वरीत होणे अपेक्षीत असते. त्यामुळे घटनेचे गांभिर्य लक्षात येताच उपस्थित स्थानिक आधिकाऱ्यांनी त्वरीत हालचाली करुन घटनेचे गांभिर्य वरिष्ठ आधिकाऱ्यांपर्यंत पोहचविणे जरुरीचे असते. पण घटने दिवशी रविवार हा सुटीचा दिवस आणि त्या अगोदरच पार पडलेला दिवाळी सण यामुळे येथील स्थानिक शासकीय यंत्रणा देखील सुस्त झालेली होती का ? असा देखील सवाल आता उपस्थित होवू लागला आहे.
कारण संपुर्ण मदत कार्य हे तब्बल पंचवीस तास सुरु होते असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. इतके तास मदतकार्य चालले हे भूषणावह नाही. कारण घटनेचे गांभिर्य ओळखून, प्रसंगावधान राखून स्थानिक अधिकाऱ्यांनी, जिल्हायातील उच्चपदस्थ आधिकाऱ्यांनी त्वरीत निर्णय घेणे अपेक्षीत असते. त्यांच्या समोर एक नाही तर अनेक पर्यांय उपलब्ध् असतात. मात्र त्यांची अंमलबजावणी होणे महत्वाचे असते. एकीकडे प्रगत तंत्रज्ञान, आधुनिक यंत्रसामुग्री असताना देखील रेस्क्यु आँपरेशनला पंचवीस, पंचवीस तास लागतात ही खरोखरच खेदाची बाब आहे. त्यामुळे अशा घटनां नंतर स्थानिक अधिकारी, जिल्ह्यातील प्रमुख आधिकाऱ्यांचे त्वरीत निर्णय घेताना कसब पणाला लागत असते. मात्र निव्वळ याच बाबीची येथील घटने नंतर थोडी कमतरा दिसून आल्याचे रिस्केव्यु आँपेशनला लागलेल्या पंचवीस तासावरुन दिसून आले.
कारण प्रशासनाकडून हे आँपरेशन हाताळण्यासाठी ज्यावेळी एनडीआरएफला पाचारण करण्यात आले त्यानंतर या पथकाच्या जवानांनी केवळ दोन तासांमध्ये पहिला मृतदेह बाहेर काढला. कारण या पथकातील अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना अशा प्रकारच्या घटना घडल्या नंतर त्या कशा हाताळाव्यात याचे प्रशिक्षण दिलेले असते. अशा प्रकारच्या विविध घटनांच्या रेस्क्यु आँपरेशनचा त्यांना पूर्वानुभव असतो. या घटना हाताळत असताना त्यांच्याकडे अद्ययावत अशी यंत्रसामुग्री असते. त्यामुळे त्या पथकाच्या या जमेच्या बाजू असतात. त्यामुळे रविवारी रात्री सव्वा आठ वाजता घटनास्थळी पोहचुन देखील एनडीआरएफ टीमने ढिगाऱ्याखाली गाडलेल्या चारही कामगारांचे मृतदेह सोमवारी सकाळी ११ वाजेपर्यंत बाहेर काढले. त्यामुळे संबंधित रेस्क्यु आँपरेशनला एकुण लागलेल्या तासांचा विचार करताना ही टीम येथे दाखल झाल्या नंतर रात्रीची वेळ असताना, समोर अनेक आव्हाने असताना काही तासातच सर्व मृतदेह बाहेर काढण्यात या टीमला यश आले याबाबी देखील आधोरेखीत होणे येथे महत्वाचे आहे. त्यामुळे जर घटनेनंतर त्वरीत ही टीम घटनास्थळी दाखल झाली असती तर कदाचित गाडले गेलेऱ्या चारही कामगारांचे जीव वाचले असते अशी देखील चर्चा सध्या तालुक्यात चर्चिली जावु लागली आहे.
एकीकडे प्रशासनाकडून घटनेची चौकशी करण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या चौकशीतून विहिर खोदताना कोणत्या सामुग्रीचा उपयोग झाला. विहिर खोदताना सुरक्षेच्या उपाययोजना केल्या होत्या का ? या बाबी पुढे येतीलच. मात्र दुसरीकडे घटने नंतर एनडीआरएफला घटनास्थळी पाहोचण्यासाठी ऐवढा उशिर का झाला ? या टिमला पाचारण करण्यात प्रशासनाचा हलगर्जीपणा झाला का ? किंवा आधिकाऱ्यांनी सूचित करुन देखील ही टिम ऐवढ्या उशिराने घटनास्थळी कशी पोहचली याचा देखील गांभिर्याने विचार होणे महत्वाचे आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...















