लोहा – लोहा तालुक्यातील पेनूर, अंते श्वर, भारसवाडा ही तीन गावे गोदाकाठी वसली आहेत. या तिन्ही गावात अंतर्गत सिमेंट रस्ते व बंदिस्त नाली बांधकाम केले जाणार आहे.मंगळवारी (१७ नोव्हेंबर ) सकाळी पेनूर येथे ४ कोटी ९९ लक्ष, अंतेश्वर गावात ३ कोटी ९९ लक्ष, व भारसवाडा २ कोटी ९९ लक्ष अशी एकूण ११ कोटी ९७ लक्ष रुपयांच्या कामाचा शुभारंभ आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते गावकऱ्यांच्या साक्षीने करण्यात आला .विकास कोण करू शकते याची पारख असावी कोणाच्याही मागे धावत सुरू नका असा खोचक सवाल उपस्थित करत दुष्काळी परिस्थितीत पाणी व चारा जपून वापरावा संयमाने यानैसर्गिक संकटास सामोरे जाऊ यात असे आवाहन आ प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले
पेनुर येथे कार्यक्रम अध्यक्ष गुरु आप्पा धोंडे, यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी आ प्रतापराव पाटील चिखलीकर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर
तहसीलदार विठ्ठल परळीकर, नगराध्यक्ष शरद पवार,शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाळू पाटील कऱ्हाळे माजी सभापती आनंदराव ढाकणीकर,माजी उपनगराध्यक्ष दता वाले
,खुशाल पाटील पांगरीकर,, सा बां उपअभियंता सुमीत पाटील,जि बाप बांधकाम उपअभियंता शिवाजी राठोड, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष छत्रपती स्वामी , मारोती एजगे
सुनील पेनूरकर, गटविकास अधिकारी मांजरमकर, नगरसेवक हारीभाऊ चव्हाण, सुरेश पाटील हिलाल , माजी सरपंच बाबाराव पाटील गवते
सतिश निखाते, तुकाराम दाढेल केतन खिल्लारे,,बाळु पाटील गवते, दत्ता वाले, राठोड,पेनूर नगरीचे सरपंच बाळू गवते, भारसावडा -माजी सरपंच गोपिनाथ हालगे, सरपंच नवनाथ हालगे, पेनुर सरपंच ज्ञानेश्वर पाटील गवते, गुरु माजी सरपंच गंगाधर पाटील गवते,, एडके, गुत्तेदार पळसीकर, उपस्थित होते
आ प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी गोदा काठच्या पेनूर अंतेश्वर भारसावडा या तिन्ही गावात १२ कोटी रुपयाच्या कामाचा शुभारंभ केला तेथे उपस्थिताना संबोधित करताना म्हणाले की गावाचा विकास करणाऱ्याच्या मागे ग्रामस्थांनी राहिले पाहिजे निवडणुकीत येणारे वारे कसे आहे हे ओळखता आले पाहिजे असे सांगून या तिन्ही गावात सिमेंट रस्ते व बंदिस्त नाल्या होणार आहेत विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. दुष्काळी परिस्थितीत सर्वांनी संयमाने तोंड द्यावे पाणी व चारा यांचा जपून वापर करावा असे।प्रतिपादन आ प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले
चौकट
२० तारखेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी कंधार मध्ये
कंधार येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारती राज्यातील शासकीय वास्तूच्या उत्तम नमुना पैकी एक होय बांधकाम अतिशय चांगले व भव्य झाले आहे.
.२० नोव्हेंबर रोजी राज्याच्य उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवारकंधार येथे येणार आहेत त्याच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालय इमारतीचे उद्घाटन होणार आहे . तेव्हा या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.



















